Today: Last Update:

add

संविधानामुळेच देशातील लोकशाहीचा पाया मजबूत - शंकर जगताप

Posted by Admin3

The foundation of democracy in the country is strong because of the Constitution - Shankar Jagtap

पिंपरी (प्रतिनिधी) 27,नोव्हेंबर - संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यावेळी संविधान मस्तकाला लावून जगताप यांनी अभिवादन केले.

कार्यक्रमास ,माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, दिलीप तनपुरे, सागर अंगोळकर, दत्तात्रय यनपुरे, कांता भाऊ कांबळे, उज्वला ढोरे, सोनाली जम, जवाहर ढोरे, संतोष ढोरे, तृप्ती कांबळे, सीमा पाटोळे, सुरेश ढमाले, श्याम ढोरे, प्रीतम बालवडकर, अमोल गायकवाड, शाहरुख सय्यद, संदीप तांबे, निमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, आपले संविधान हीच आपल्या लोकशाहीची ओळख आहे. या संविधानामुळेच देशात लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी चालविलेली राज्य व्यवस्था अस्तित्वात आली आणि गेल्या ७५ वर्षांत ती चांगली रुजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनतीने आणि दूरदृष्टीने आपले संविधान तयार केले. हे संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते.  

आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाहीचा पाया दिला आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आपले स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क आहे, असे जगताप म्हणाले.  

आजच्या दिवशी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्यांनी आपले संविधान तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना आदरांजली वाहतो. आपल्याला संविधानाने दिलेली ही जबाबदारी आणि हक्क जपण्याची, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेऊया, असे आवाहन आमदार जगताप यांनी या प्रसंगी केले.

Whatsapp Join