Today: Last Update:

add

महापालिका अधिकाऱ्यांचे दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

Posted by Admin3

????????? ???????????? ??????? ?????????? ????????? ????? ????????? ??????

दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर कागदविरहत कार्यालयीन कामकाजाला प्रोत्साहन मिळणार असून प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यास आणि विभागांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाजात अधिक सुसूत्रता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे दस्तऐवज हाताळण्याच्या प्रक्रियेतील गती, अचूकता, पारदर्शकता आणि सुरक्षा देखील वाढणार आहे, असे मत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी व्यक्त केले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि ई-ऑफिस या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रशासनामध्ये कागदविरहीत कामकाजाचा समावेश करण्याचे ध्येय ठेवले आहे. या अनुषंगाने कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना आज दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम – डीएमएस) चे प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. 

सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता अभियंता प्रमोद ओंभासे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, संजय खाबडे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे, पंकज पाटील, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, किशोर ननवरे, शितल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, हरविंदरसिंह बन्सल, दिलीप धुमाळ, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, महेश बरीदे, विजय वाईकर, विजय भोजने, सुनिलदत्त नरोटे, सतिश वाघमारे, विजयसिंह भोसले, वैशाली ननवरे, विजय ओहोळ, अनिल भालसाखळे, बाळू लांडे, संतोष दुर्गे, विजय सोनवणे, राजेंद्र महाजन, मानिक चव्हाण तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार येत्या २६ जानेवारीपासून डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीचा कामकाजामध्ये समावेश करण्यात येणार असून यामागचा उद्देश डिजिटल कार्यपद्धतीकडे वाटचाल करून अधिकृत नोंदींचे डिजिटायझेशन आणि केंद्रीकरण करणे आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणे हा आहे. 

डिजिटल कार्यालयीन कामकाजाकडे वाटचाल करत असताना, नागरीकांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरीक केंद्रित सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेने उचललेले एक महत्वाकांक्षी पाऊल असून यामुळे नागरीकांना अधिक प्रतिसादक्षम व जबाबदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत मिळणार आहे, असेही निळकंठ पोमण म्हणाले. 

यावेळी डॉ. प्रशांत परसाई यांनी जीआयएस अनेबल ईआरपी सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या कोअर ईआरपी प्रणाली, जीआयएस प्रणाली, नॉन कोअर मॉड्युल, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टीम या बाबींची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिकारी दीपक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Whatsapp Join