भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' रसरंग' या भरत नाटयम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ' नुपूर झंकार अकादमी'च्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.
नृत्य प्रशिक्षक रूपा जोशी यांच्या शिष्या नेहा म्हमाणे, अदिती जोशी, ऋजुता अदवंत यांनी विलोभनीय नृत्य सादर केले. उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.प्रेम रंग, शून्यातून शुन्याकडे,कृष्णकला, रासक्रिडा अशा बहारदार नृत्य रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. शांतरस, श्रुंगाररस,हास्य, करुण,वीर रस अशा अनेक रसशास्त्रीय आविष्कार सादर करण्यात आले.सौ. नीना भेडसगावकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि कलाकारांचा सत्कार केला
शनीवार,दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत होणारा हा २२८ वा कार्यक्रम होता.