Today: Last Update:

add

तिरळेपणावर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 

Posted by Admin3

Organized free surgery camp at DY Patil Hospital at Tirlepan

 

पिंपरी (प्रतिनिधी) पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, डॉ. डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी व लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक दिपक कुदळे यांनी दिली.

या शिबिरात तपासणीसाठी शुक्रवार दि. 5 डिसे. 24 पासून दररोज स. 9 ते सायं. 4 पर्यंत या वेळेत नाव नोंदणी करावी लागेल.अंतिम तपासणी - शनिवार दि. 7 डिसे. 24 वेळ : स. 10 ते दु.2 वाजेपर्यंत तर अंतिम शस्त्रक्रिया रविवार दि. 8 डिसे. 24 या कालावधीत होईल. 

 डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय एम.आय.डी.सी, पवना इंडस्ट्रिज शेजारी, भोसरी, / पिंपरी या ठिकाणी होणार आहे.  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर तिरळेणावर संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया होईल. 

या शिबिरात पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव डॉ. राजेश पवार, डॉ. रमेश भागे,डॉ. ललित शहा, डॉ. सतिश देसाई (कार्याध्यक्ष),डॉ. वैभव बनारसे,डॉ. संपत पुंगलिया (खजिनदार) हे रुग्णसेवा करणार आहे.

यावेळी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार,प्राचार्य डॉ. गुणवंत येवला,

लायन्स क्लब पुणे शताब्दीचे अध्यक्ष अध्यक्ष तेहमास भरूचा माजी अध्यक्ष दीपक कुदळे,कैलाश मलिक

 फ्रेडी गोदरेज,आर. के. शहा आदी उपस्थित राहणार आहे. 

या शिबिरात सहभागी होण्यासाठी 7796663366/ 8329152398 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Whatsapp Join