Today: Last Update:

add

मोबाईल व्यसनींसाठी डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन

Posted by Admin3

?????? ??????????? ?????? ??????? ???????? ?????

पिंपरी (प्रतिनिधी) पिंपळे सौदागर येथील लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने कुमारवयीन मुलांसाठी दि. १ डिसेंबर २०२४ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान "डिजिटल संस्कार" या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दर रविवारी २ ते ३ सत्रे असे एकूण २५ ते ३० सत्रात होईल. हे शिबिर पिंपरी येथील एएसएम संचलित आयपीएस कॅम्पस, जुना मुंबई पुणे महामार्गालगत  पिंपळे पेट्रोल पंपा जवळ , पिंपरी येथे असलेल्या महाविद्यालयात होणार आहे. शुभारंभ दि.१ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. अशी माहिती भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष विकास वारके, संस्थापक पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णाजी खडसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आजकाल मुलांमध्ये मोबाईलची व्यसनाधीनता जडलेली असून त्यामुळे शैक्षणिक, मानसिक आरोग्य अशा स्तरांवर या गोष्टींचा मुलांवर दुष्परिणाम होत आहे. मोबाईलसाठी व्यसनाधीन बनत चाललेल्या विद्यार्थ्यांना त्यापासून परावृत करून विधायक कौशल्यांकडे कसे वळवावे यासाठी या शिबिरामध्ये तज्ञ मंडळी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उदघाटन दि १ डिसेंबर रोजी दु वा होणार आहे. यावेळी डॉ. दिनेश नेहेते, डॉ आशिष पाटील हे कुटुंबातील सुसंवाद आणि मेंदूचे आरोग्य यावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. ८ डिसेंबर रोजी मोबाईल गेमिंग आणि सोशल ग्रोथ या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ मानस गाजरे हे मार्गदर्शन करणार आहे. दिनांक १५ डिसेंबर रोजी "दिल दोस्ती दुनियादारी (लैंगिक शिक्षण )आणि मानसिक आरोग्य" या विषयावर राजेंद्र बहाळकर आणि डॉ. अमोल जावळे हे मार्गदर्शन करतील. दि. २२ डिसेंबर रोजी "आरोग्य आणि आहार व्यवस्थापन" या विषयावर डॉ संजय लेले आणि आहारतज्ञ रश्मी राणे व्याख्यान देणार आहेत. दिनांक २६ डिसेंबर रोजी कान नाक घसा तज्ञ डॉ. प्रमोद महाजन हे श्रवणशक्ती ची निगा, नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा पाटील या "डोळ्याचे आरोग्य व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शन करतील. दि. २९ डिसेंबर रोजी सायबर क्राईम आणि सेक्युरिटी रोड मॅप या विषयावर अभिजीत पाटील आणि मनोजकुमार चौधरी मार्गदर्शन करतील. दि. ५ जानेवारी 2025 रोजी तंत्रज्ञान हाताळताना ठेवायचा समतोल आणि कौशल्य विकास या विषयावर डॉ भूषण शुक्ला आणि ध्येय निश्चित व भावनिक संतुलन या विषयावर विभावरी इंगळे या मार्गदर्शन करतील. दि. १२ जानेवारी रोजी स्मार्ट युजेस ऑफ इंटरनेट फॉर फॉर्च्यून रेडी करिअर पाथ आणि मी व माझे विचार या विषयांवर रश्मी वाघमोडे आणि सारिका पाटील व्याख्यान देणार आहेत. दिनांक १९ जानेवारी रोजी या शिबिराचा समारोप होईल. या शिबिरातील सत्रे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी अल्प दर आकारण्यात आलेला आहे. 
आपल्या मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी काळाची गरज ओळखून पालकांनी व विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभागी व्हावे. शिबीराच्या अधिक माहितीसाठी समन्वयक सारिका पाटील 8308550800 आणि विभावरी इंगळे 9423573071 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Whatsapp Join