Maharashtra Assembly Elections: युवा नेते पार्थ पवार यांचा अण्णा बनसोडे यांच्या साठी मोट बांधण्याचा प्रयत्न
पिंपरी, पुणे (दि.११ नोव्हेंबर २०२४) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या .
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचीही पार्थ पवार यांनी भेट घेतली. ज्येष्ठ नेते नंदू कदम, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पिल्ले, प्रदेश युवा मोर्चाचे अनुप मोरे,माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, जितेंद्र ननावरे, शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी यांच्या जनसंपर्क कार्यालयांना व निवासस्थानी पार्थ पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली. व चर्चाही केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष फजल शेख, चंद्रकांत गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, रवी काची,
अजित भालेराव, देवदत्त लांडे, पंकज दलाल, शाकीर भाई शेख, बादशाह इटकर , धरंम वाघमारे, धर्मेंद्र क्षीरसागर, गणेश लंगोटे, जयेश चौधरी, राजू होसमणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी विधानसभेमधील सर्वच प्रभागांमध्ये असणारा दांडगा जनसंपर्क हा उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी लावून सर्वतोपरी अण्णा बनसोडे यांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे या भेटीदरम्यान पार्थ पवार हे म्हणाले.
पिंपरी मधील सध्याची परिस्थिती त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय काय केले पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने सांगण्यात आले.